Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमरावेर शहरात ५ ठिकाणी घरफोड्या; पोलिसांना आव्हान

रावेर शहरात ५ ठिकाणी घरफोड्या; पोलिसांना आव्हान

रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात घरफोडयांचे सत्र सुरूच आहे.रावेर शहरात अष्टविनायक नगर व परिसरातील बंद दरवाजाची संधी साधून चार ते पाच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एका ठिकाणी सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला .या बाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .

याबाबतचे वृत्त असे की येथील अष्टविनायक नगरातील रमेश चौधरी हे नागपूर येथे आपल्या मुलीकडे गेले होते .ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरातील कपाटातून दहा हजार रुपये रोख व सात हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले . या बाबत चौधरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान या कॉलनी परिसरातील . तीन चार बंद घराचे कुलुप तोडले .मात्र या घरांचे घरमालक बाहेरगावी गेल्यामुळे चोरीचा तपशील समजू शकला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या