Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeक्राईमराष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांना ठार मारण्याची धमकी...!

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांना ठार मारण्याची धमकी…!

पुणे/विशेष प्रतिनिधी/,पोलीस दक्षता लाईव्ह:- माजी केंद्रीय संरक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी दाखल झाल्या आहेत. शरद पवार यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह ट्विट करत धमकी दिली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले आहेत. शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. तात्काळ या व्यक्तींना अटक करावी अशी मागणीही केली आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेश बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण अ‍ॅडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या कॉमेंटर वाचल्या एवढा द्वेश कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या