Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावरिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बैठकीत विविध चर्चा

रिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बैठकीत विविध चर्चा

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन या ठिकाणी रिया स्पोर्ट्स अकॅडमी च्या सर्व पदाधिकारी यांची सर्व साधारण बैठक पार पडली.बैठक रिया स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तसेच जळगांव चे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.बैठकीत रिया स्पोर्ट्स अकॅडमीचे साधारण अहवाल, आतापर्यंतचा प्रवास, खेळाडूंची कामगिरी, तसेच येणाऱ्या काळात खेळाडूंसाठी विविध साहित्य, प्रशिक्षण, मैदान, या सर्वाची उपलब्धता आणि खेळाडूंची कामगिरी उंचवण्या साठी, विविध संधी उपलब्ध करून देण्या साठीचे नियोजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष श्री. भंगाळे, उपाध्यक्ष ललित महाजन, राजेश वारके, प्रा. योगेश महाजन, प्रा. वानखेडे सर, प्रा. उमेश पाटील, दीपक वाडे, ॲड. देवेंद्र सुर्यवंशी, क्रीडा शिक्षक मनोज परदेशी, भूषण काकुस्ते, अजय काशीद, प्रवीण राव, प्रवीण पाटील, मयुर पाटील, यशवंत पाटील, विशाल पाटील, शुभम देशमुख तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या