Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावरेतीचा गोरखधंदा करणारा ' तो ' जळगावचा पोलीस अखेर निलंबित; विभागीय पातळीवर...

रेतीचा गोरखधंदा करणारा ‘ तो ‘ जळगावचा पोलीस अखेर निलंबित; विभागीय पातळीवर चौकशी सुरू..!

जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात आणि तालुक्यासह इतर ठिकाणी अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. काही वाळू माफियांनी गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण या धंद्यात उतरून स्वतःला वाळू माफिया म्हणवून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेहमीच वादग्रस्त असा हा व्यवसाय ठरला आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या व्यवसायात अनेक जण गुंतले आहेत. यात पोलिसही मागे नसल्याने एक पोलीस कर्मचारी स्वतः वाळूचा व्यवसाय चालवीत असल्याचा प्रकार पुढे आल्याने त्याच्यावर चौकशी सुरु असेपर्यंत निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केली, अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.नवीन रुजू झालेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध वाळूप्रश्नी लक्ष घातले आहे. त्यामुळे अवैध वाळू कारवाईंना वेग येत आहे. तालुक्यातील दापोरा येथे पोलीस कर्मचारी स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी धडक कारवाई केली. दापोरा येथे ७ ते ८ ट्रॅक्टर अवैध वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलिसांना ऑनलाईन केलेल्या तक्रारीवरून ही माहिती समोर आली आहे.त्यात तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू वाहतूकदारांशी संबंध असून त्याचे स्वतःचे एक ट्रॅक्टर दुसऱ्याच्या नावावर घेतलेले आढळून आले आहे. त्यामुळे विश्वनाथ गायकवाड यांच्या कारनाम्यामुळे खाकी डागाळली आहे. काही तथा कथितांचे धाबे दणाणले आहे. गेल्या महिनाभरात वाळू विषयावर काहीनाकाही अनुचित प्रकार घडले असून याकडे आता नूतन जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या