भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे.घरकाम करणाऱ्या चौदा वयाच्या अल्पवयीन मुलीवर लग्न करण्याचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार करण्यात आल्याने पीडीता ही चार महिन्यांची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित इम्रान मुक्तार सैय्यद (वय 22, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात पोस्को कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानेवारी २०२३ पूर्वीच्या चार महिन्याआंधी संशयित इम्रान मुख्तार सैय्यद (२२) याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरात पीडीतेस इशाऱ्याने बोलावले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरदस्तीने अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले तसेच पीडीतेसोबत सेल्फी काढून ती पोस्ट इन्स्टाग्रामवर ठेवली. अत्याचार झाल्याने पीडीता त्यातून चार महिन्यांची गर्भवती राहिली व आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने पीडीतेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती मांडल्याने पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्को कायदान्वये संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस
वानखडे हे करीत आहेत.