भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ येथील ललवानी फाउंडेशन तर्फे कुऱ्हापानाचे येथील ललवाणी फार्म या परिसरात जामनेर भुसावळ रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांसाठी शितल जल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सर्व धर्मांच्या व जैन साधुसंतांच्या विहारांमध्ये विश्राम करण्यासाठी ललवाणी आराधना भवनाचे उदघाटन श्रीमती प .क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी.एम.ललवाणी यांच्या श्रद्धास्थानी असलेले दानशूर व्यक्तिमत्व स्व. मोती भाऊ कोटेचा यांच्या तैलचित्राचे गणेश मंदिरात अनावरण करण्यात आले. शितल जल आराधना भवन व तैलचित्राचे अनावरण आमदार संजय सावकारे,अँड अकील इस्माईल, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, उद्योजक किरण महाजन, उद्योजक अनिल जैन, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा, टॅक्स कन्सल्टंट राजीव चोपडा, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष प्रशांत कोटेचा, ललवाणी परिवाराचे मदनलाल ललवाणी, कुऱ्हा येथील संघपती नंदलालजी छाजेड ,यांच्या उपस्थितीत झाले.
याप्रसंगी श्री. सावकारे यांनी या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते तैलचित्र करण्यार्या आशिया बुक अवार्ड विजेत्या चित्रकार रचना महाजन यांचा सन्मान करण्यात आला. तैलचित्र पाहुन सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. अँडवोकेट अकील ईस्माईल यांनी प्रा. ललवाणी यांच्या संबंधांना उजाळा देऊन एक चांगले व्यक्तिमत्व म्हणुन आम्हाला मोठा बंधू मिळाला व कौटुंबिक संबंधांना ऊजाळा दिला. ललवानी फाउंडेशनने केलेल्या या कार्याचे कौतुक केले. समाजात अशा संस्था विरळ असल्याचे नमुद केले.
आमदार सावकारे यांचा सत्कार मदनलाल ललवाणी , निळकंठ भारंबे यांचा सत्कार नलीन ललवाणी, किरण महाजन यांचा सत्कार अनिल कोटेचा, राजीव चोपडा यांचा सत्कार संजय नाहाटा ,अँड अकिल इस्माईल यांचा सत्कार आमदार संजय सावकारे,कुऱ्हा संघपती नंदलाल छाजेड यांचा सत्कार मानस ललवाणी यांनी केला.
भुसावळ येथील ज्योती गादिया,लता सिसोदिया ,शोभा छाजेड ,रिटा छेडा,मधु लोढा ,अनिता साखला.छाया कटारिया यांनी आराधना भवन ललवाणी परिवाराने निर्माण करून एक चांगली धार्मिक सुविधा ऊपलब्ध करुन दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.के नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक प्रा.जी.एम.महाजन,शिक्षीका वंदना भिरुड,तलाठी वैशाली मुन,स्टेट बँक अधिकारी नितीन छेडा,ऊद्योजक बाबुशेठ चोरडिया,केमिस्ट अतुल ताथेड,मनिष चोरडिया,सुनिल साखला,रामजी बंब, जवाहर डेअरीचे संचालक हेमंत पाटिल यांनी मोतीभाऊ यांच्या तैलचित्राबाबत च्या निर्णयाचे कौतुक केले. कमलेश निकुंभे,भरत कोळी,किरण बोलके,कुर्हेकर जगदिश बारी,चंद्रशेखर शिंदे,बशिरभाई,,जामनेरकर प्रमोद बोरा,प्रकाश बोरसे,पुंडलिक चौधरी सर यांनी शितल जल ऊपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.