Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावललवानी फाउंडेशन तर्फे स्व.तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व.तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण

भुसावळ/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम .ललवाणी यांच्या मातोश्री च्या स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फॉर्म मध्ये गणेश मंदिरात स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलाल ललवाणी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ललवाणी परिवारातील नलिन ललवाणी, मनीषा कर्नावट, मानस ललवाणी व महिला वर्ग उपस्थित उपस्थित होता . याप्रसंगी स्व. तारादेवी ललवाणी यांच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावले. त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा ललवाणी यांनी महिलांसाठी कुंभारी येथील जगात भारी कृषी पर्यटन केंद्रास सहलीचे आयोजन करून माहेरचा आहेर या कार्यक्रमास उपस्थिती दिली .यावेळी 50 महिलांना त्यांनी ही माहेरची वारी घडवून आणली .यामध्ये सर्वधर्मीय महिलांचा समावेश होता. या माहेरच्या वारी कार्यक्रमात महिलांनी आनंद लुटला. या आनंदात विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा, सफारी, रेन डान्स यांचा समावेश होता. तसेच या केंद्राचे संचालक प्रभाकर साळवे व ज्योती साळवे हे सुद्धा या आनंदात सहभागी झाले. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनिअर भाऊ कदम यांनी विविध प्रकारे मिमीक्री करून महिलांचे मनोरंजन केले. प्रभाकर साळवे यांनी अनेक रोगांवरील औषधोपचाराची माहिती दिली. त्याचप्रमाणे खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे व तसेच कृषी क्षेत्रातील अनेक बाबी समजून सांगितल्या .महिलांनी घोडा सफारी ,बैलगाडी सफारी, जंगल सफारी आदींचा मनमुराद आनंद घेऊन बारा बलुतेदार ही संकल्पना समजून घेतली. कार्यक्रमस्थळी महिलांचे हळदी ,कुंकु, अक्षता लावुन स्वागत करण्यात आले.माहेरचा आहेर या कार्यक्रमात भुसावळ येथून गेलेल्या ललवाणी फाउंडेशनच्या सहभागी महिलामधील पहिलं बक्षीस मयुरी राहुल संचेती यांनी दोन ग्रॅम सोन्याची अंगठी तर वंदना ढाके यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.

मंगला कोटेचा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कल्पना गादिया,लता सिसोदिया ,जयश्री बोथरा,संगिता मुगदिया,संगिता मंडलेचा,कल्पना नाहार,आशा मगरे,वैशाली मुन,रिटा छेडा,पुनम कोळी,कविता डोंगरे,दीपा गादिया,मधु ललवाणी,मयुरी संचेती,कुंदन छाजेड,सुनिता गादिया,किर्ती कोटेचा,खुशबु सिसोदिया, सुनिता कुंभार,छाया ईंगळे,राधा शर्मा आदी महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या