मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
भुसावळ/उपसंपादक एकनाथ बोरोले/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ येथील ललवाणी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा नातू चिरंजीव आरव याच्या वाढदिवसानिमित्त ललवानी फाउंडेशन तर्फे मुशाल तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी व बागडण्यासाठी विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आली. यामध्ये क्रिकेट ,फुटबॉल, रॅकेट, बॉल आधी खेळाच्या वस्तूंचा समावेश आहे. सदर साहित्य केंद्रप्रमुख श्री के.पी.चौधरी, मुख्याध्यापक श्री दीपक सुरवाडे सर ,उपशिक्षक श्री प्रवीण मोरे सर, वराडसिम चे मुख्याध्यापक किशोर माळी, मांडवे दिगरचे मुख्याध्यापक संजय वंजारी ,आणि भिलमडीच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांच्याकडे ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी उपाध्यक्ष सौ.शोभा ललवाणी, ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, व सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी यांच्या उपस्थितीत देण्यात आले .याप्रसंगी या शाळेतील शिक्षक श्री प्रवीण मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून ललवाणी परिवाराने सदैव मुशाल तांडा येथील प्राथमिक शाळेत भेटी देऊन विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत.त्याचप्रमाणे आज हे क्रीडा साहित्य शाळेला उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांमध्ये खेळाची भावना रुजू होण्यास मदत होईल.या उपक्रमाबद्दल त्यांनी ललवाणी परिवाराचे आभार मानले.
याच प्रसंगी आरवच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे सुद्धा देण्यात आली. फौंडेशनच्या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रात स्वागत करण्यात आले. शाळेने संधी ऊपलब्ध करुन दिल्यामुळे ललवाणी फौंडेशनच्या ऊपाध्यक्षा सौ.शोभा ललवाणी यांनी शाळाव्यवस्थापनाचे आभार मानले. त्याचप्रमाणे गरीब मुलांना कपडे ही वाटप करण्यात आले.