सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी संजीवनी सप्ताह तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुलै पर्यन्त सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमांमध्ये पूर्ण सप्ताहमध्ये शेतकऱ्यांच्या संपर्कात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा उद्देश कार्यक्रमाचा आहे .कृषी तंत्रज्ञान प्रसार दिन, पौष्टिक आहार प्रसार दिन, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, जमीन सुपीकता जागृती दिन, कृषी क्षेत्राची भावी दिशा, कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन, तसेच शेवटी कृषी दिन एक जुलैला साजरा करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वाघोदा खुर्द येथे करण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक राजेंद्र कोंडे यांनी यानिमित्त कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी ( सर), किशोर नारखेडे, अनिल पाटील, वसंत चौधरी, युवराज कोळी, सुभाष चौधरी, मिलिंद चौधरी, रमेश शिंदे, जगदीश चौधरी, मुस्तफा पटेल, रविंद्र कोळी, वैभव चौधरी व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
लहान वाघोदा येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा
RELATED ARTICLES