Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमलाचखोर महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटरला एसीबीने केली अटक

लाचखोर महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटरला एसीबीने केली अटक

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जामनेर/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:-जामनेर- पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर लावून देण्यासाठी १५०० रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीच्या टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी यांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे करण्यात आली आहे.या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. फत्तेपूर येथील रहिवाशी असलेला तक्रारदार याने त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद पवार सह खासगी पंटर कलीम तडवी या दोघांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते. महावितरण चे कर्मचारी हे टाळाटाळ करून दुर्लक्ष करत होते. मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने आज बुधवारी १९ एप्रिल रोजी दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात अटक करण्यात आली.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या