Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमलाच घेतल्याप्रकरणी एसीबीने घेतले हवालदारास ताब्यात

लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने घेतले हवालदारास ताब्यात

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ पकडल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.गेल्या दोन महिन्यांत जवळपास ६ ते ७ जणांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या