Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeजळगावलोकसेवक मधुकरराव चौधरी यांना अभिवादन

लोकसेवक मधुकरराव चौधरी यांना अभिवादन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे राष्ट्रीय सण उत्सव समितीतर्फे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तसेच माल्यअर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी तरुण अवस्थेतच राजकारणात आपली चुणूक दाखवित महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय दिशादर्शक असे कार्य केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात शिक्षण, वित्त, नियोजन, महसूल, पाटबंधारे, ऊर्जा, वण आरोग्य, नगरविकास व सांस्कृतिक कार्य विभाग अशा अनेक विभागांच्या माध्यमातून बालभारती ची स्थापना, एक सूर एक ताल, सातपुडा विकास, आदिवासी विकास, सिंचन प्रकल्प विकास, डोक्यावरून मैला वाहण्यावर बंदी, श्वेत पत्रिका, अशी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. १९९० ते १९९५ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हिंदी भाषेचा विकास झाला, हिंदी भाषेला विश्वभाषे चा दर्जा मिळावा यासाठी ‘युनो’ या आंतरराष्ट्रीय संस्थेत पाठपुरावा करून प्रस्ताव सादर करण्यात आला. जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या नेतृत्वाचा सन्मान म्हणून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या