मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..
सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती – डॉ.सदानंद धनोकार
लोणी गुरव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-दि.४:आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली दिनचर्या अनियमित झालेली आहे. त्यामुळे आजच्या काळात सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती होय. प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी लोणी गुरव सारख्या छोट्याशा गावात हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करणे हा स्तुत्य उपक्रम आहे . त्याबद्दल शिंगाडे परिवार कौतुकास पात्र आहे. असे प्रतिपादन खामगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.सदानंद धनोकार यांनी केले .
वै.पुरुषोत्तम हरी गणेश पाटील ट्रस्टच्या वतीने श्री ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे मार्गदर्शनात दि ४ एप्रिल रोजी माऊली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शेगावच्या सहकार्याने जि.प.शाळा लोणी गुरव येथे स्व.भानुदासजी शिंगाडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .
या शिबिराचे उद्घाटन संत अच्युत महाराज हॉस्पिटल अमरावतीचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.कमलेश पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये लक्ष्मणराव शिंगाडे लोणी गुरव,अजय तायडे ( सचिव म. प्र . काँग्रेस ओबीसी सेल ),डॉ.अतुल पाटील (नेत्ररोग तज्ञ ), डॉ.पंकज भुतडा ( जनसंपर्क अधिकारी, माऊली सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल शेगाव ), डॉ.राहुल चावरे ( शेगाव ), ज्ञानदेवराव चिमणकार ( माजी पं.स.सदस्य ),नामदेवराव बहादरे ( सामाजिक कार्यकर्ते ), विलासभाऊ क्षीरसागर ( सामाजिक कार्यकर्ते ),श्रीमती अंबिका भगत ( सरपंच ग्रा.पं. लोणी गुरव ),शिवाजी थोलबरे ( उपसरपंच ), कुलदीप धनोकार ( शांताई कॉन्व्हेंट पळशी बु.), बोराडे सर (पळशी बु.), संजय महाराज ( तोरणवाडा ), रविंद्र गुरव ( कदमापूर ), सौ.लक्ष्मी सवळे, सौ.अनुराधा म्हस्कर ( ग्रा.पं.सदस्या ) यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचा शिंगाडे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलचे सचिव मा.अजय तायडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले .
शिबीराला मा.तेजेंद्रसिंग चौहान ( अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल ) , मा.बळीरामभाऊ वानखडे ( संपादक, समाजनिष्ठा ),मोनाली वानखडे ( का.संपादक, समाजनिष्ठा ), साहित्यिक लक्ष्मणदादा दारमोडे इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व आभारप्रदर्शन पुरुषोत्तम शिंगाडे यांनी केले .
लोणी गुरव व परिसरातील तीनशे रुग्णांनी हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला . शिबीरामध्ये रुग्णांचा रक्तदाब , ब्लड शुगर तपासणी, ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पुढील उपचारांची गरज असलेल्या सर्व रुग्णांना माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जीवनदायी योजनेअंतर्गत पुढील आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात येतील .
शिबीर यशस्वी करण्यासाठी माऊली सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल शेगावचा सपोर्टींग स्टाफ तसेच दत्तात्रय शिंगाडे, गोपाल शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, दिलीप शिंगाडे, अविनाश बायस्कर,अंबादास शिंगाडे, सारंगधर शिंगाडे, विजय शिंगाडे, चेतन शिंगाडे, श्रीपाद शिंगाडे, अशोक शिंगाडे, आर्यन शिंगाडे, कृष्णा शिंगाडे, कु . अवंती शिंगाडे तसेच शिंगाडे परिवार लोणी गुरव व ग्रामस्थांनी सहकार्य केले .