Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रलोणी गुरव येथे हृदयरोग व नेत्ररोग शिबिराचे आयोजन

लोणी गुरव येथे हृदयरोग व नेत्ररोग शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

खामगांव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- लोणी गुरव माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेगावच्या वतीने लोणी (गुरव ) ता .खामगाव येथे मंगळवार दि ४ एप्रिल २०२३ रोजी भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . लोणी गुरव येथील माजी सरपंच स्व . भानुदासजी शिंगाडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शिंगाडे परिवार लोणी (गुरव ) यांचेकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे .
माऊली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शेगावच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांसाठी नि:शुल्क एंजिओग्राफी व निःशुल्क एंजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध राहणार आहे . जीवनदायी योजनेअंतर्गत विविध तपासण्या व आवश्यक असल्यास शेगाव येथे शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .या सुविधेअंतर्गत एंजिओप्लास्टी, पेसमेकर ,लहान मुलांची बिनटाक्याची हृदय शस्त्रक्रिया, हात व पायांच्या नसांवर होणारी शस्त्रक्रिया इत्यादी आजारांवर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची नेत्र तपासणीही या शिबिरात केली जाणार आहे .तरी या हृदयरोग व नेत्ररोग शिबिराचा लोणी गुरव, दस्तापूर, पळशी बु.,पळशी खुर्द, कदमापूर, शहापूर व परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिंगाडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या