वरणगाव : येथील सिध्देश्वरनगर येथील टेकडीवरील पाणी भोगावती नदीपर्यंत जाण्यासाठी या भागात रेल्वे प्रशासनाने ब्रिटीश काळात पूल बाधण्यात आला होता . या पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे . पुलाच्या छताचे व खालच्या बाजुचे सिमेंट निघत असून आसाऱ्या उघड्या पडू लागल्या आहेत. या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रेल्वे पुलावरून रेल्वे गाडी धावत असतांना सॅल्बचे छोटे छोटे तुकडे खाली पडतात. या पुलाखालून शेतकरी, विद्यार्थी व नागरीक ये जा करीत असल्याने नागरिकांना धोका वाटतो.
ब्रिटीश काळात भुसावळ ते नागपूर रेल्वे रुळ टाकतांना हा रेल्वेचा पुल बांधण्यात आला होता. दुसरा रेल्वे रुळ टाकण्यासाठी पूल बांधण्यात आला होता. सिध्देश्वरनगर येथील पाणी या पुलाखालून भोगावती नदीपर्यंत पाणी पोहचत होते. कालांतराने रेल्वेच्या पलीकडे वस्ती बसू लागली जवळपास पाच ते सात हजाराच्या वर येथील लोकसंख्या या परिसरात असून या पुलाचा वापर येथील नागरीक करू लागले. पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचल्याने नागरीकांना पाण्यातून वाट काढावी लागते. त्यातच या पुलाची मोठया प्रमाणात दुरवस्था होते. छ्ताचे सिमेंट खाली पडू लागले आहे. यामुळे या पुलाच्या आसाऱ्या उघड्या पडू लागल्या असून एखाद मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबधीत प्रशासनाने पहाणी करून दुरस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी, विद्यार्थी , नागरीक व वाहनधारकांनी केली आहे.
वरणगाव सिध्देश्वनगरातील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाची दुरवस्था
RELATED ARTICLES