Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान..

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान..

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह.
जळगाव/प्रतिनीधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील रहिवाशी वसंत शंकर कोलते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक आंबेडकर वादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलनाच्या सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो.त्यात वसंत कोलते यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

सध्या तेजोदिप नवविचार फाऊंडेशन, नाशिकचे सचिव म्हणून गेल्या पाच वर्षांपासून काम पहात आहेत. त्यांच्या संग्रहीत सुविचार धन पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ते गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक कार्यात, ग्रामीण भागात विविध समाजोपयोगी जनजागृती पत्रके वाटप करून अनेकांना हालाखिच्या व्यवस्थेतून बाहेर काढून नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई व विदेशात अर्थाजनासाठी जाण्याकरिता अनेकांना त्यांनी उद्युक्त केले आहे. ते नुकतेच गेल्या ऑगस्ट २०२२ मध्ये ते पत्रकारितेतील पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालेत.

गेल्या १९ वर्षांपासून वेगवेगळ्या फाऊंडेशन, सामाजिक मंडळांवर जबाबदारीच्या पदावर ते कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.दीपककुमार खोब्रागडे हे होते. या समारंभा प्रसंगी डॉ.के.पी.वासनिक (दिल्ली), डॉ.अनिल सूर्या, मधुकर वासनिक (दिल्ली), मल्लेश चौगुले (बेळगाव,कर्नाटक), डॉ जगन कराडे(कोल्हापूर), अॅड. भूपेश पाटील(नागपूर) आदींसह देशभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते.वसंत कोलते यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या