Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावाघोदाच्या प्रकाश विद्यालयात गुणवंतांचा गौरव समारंभ

वाघोदाच्या प्रकाश विद्यालयात गुणवंतांचा गौरव समारंभ

सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे तालुका रावेर येथील प्रकाश विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहांमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यामंदिर मोठे वाघोदे येथील पहिली ते चौथी व प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील पाचवी ते बारावी मध्ये विशेष प्राविण्य व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी टी महाजन उपाध्यक्ष श्रावण सिताराम महाजन चेअरमन डी.के. महाजन, सचिव किशोर पाटील, सहसचिव पी.एल महाजन, संचालक विजयकुमार पाटील, वसंत सुपे, कुलदीप पाटील तसेच प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन यांनी केले सूत्रसंचालन भावना पाटील यांनी व बक्षीस वाचन व्ही एम चौधरी, एन शिरसाट ,एम जी लासुरे व दीपमाला चौधरी यांनी केले तर आभार तेजस्विनी पाटील यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .तसेच यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या