Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावारकरी मंच नागपूर संस्थेला "स्वामी सेवा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३" प्रदान

वारकरी मंच नागपूर संस्थेला “स्वामी सेवा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३” प्रदान

नागपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नागपूर वारकरी मंच नागपूर संस्थेला “स्वामी सेवा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३” प्रदान करण्यात आला. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश देऊन स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना त्यांचे आधार असल्याचे संकेत दिले,त्याचबरोबर महाराजांनी हम गया नही..जिंदा है.. हा संदेश देऊन सर्व भक्तांच्या सोबत आपण सदैव असल्याचे संकेत दिले • स्वामी भक्तानी महाराजांच्या कृपाछायेखाली आपला जीवन व्यतित करावे समर्थनगरी परिवारातर्फे राज्यात देण्यात आलेला स्वामी संदेश व स्वामीरत्न पुरस्कार म्हणजे स्वामींचा आशिर्वाद असल्याचे श्री वटवृक्ष स्वामीमहाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.

संदेश स्वामीचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा २०२३ समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट संचलित समर्थनगरी अध्यात्मिक समितीच्या वतीने पुणे येथे झाला. यावेळी स्वामी भक्तांना मार्गदर्शन करताना इंगळे बोलत होते. या सोहळ्यास व्यासपीठावर वे .शा. सं. श्री अण्णू महाराज (श्री स्वामीभक्त चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट ) आणि महेश इंगळे ( अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ) स्वामीभक्त तथा प्रवचनकार विजयाताई शिरगावकर मंदिर समितीचे विश्वस्त प्रथमेश इंगळे, संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे सोहळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठातील रक्तचंदन पादुका व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथील स्वामींना नित्य वापरण्यात येणारे वस्त्र एकत्रित दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते. वारकरी मंच नागपूर शहरच्या कार्याची दखल घेत श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूळ स्थान अक्कलकोटहून समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून पुणे येथे “राज्यस्तरीय स्वामी रत्न पुरस्कार २०२३” करीता मयुर रामदासजी वाजगे वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपूर शहर या संघटनेची निवड करण्यात आली होती. मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये संदेश स्वामींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा झाला. गेली अनेक वर्षा पासून समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्यावतीने स्वामी नाम प्रसाराचे कार्य राज्यभरात केले जाते .मंगळवार ३० मे रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी पुणे येथे हा सोहळा झाला.
पुरस्कार सोहळ्यामधे वारकरी मंच नागपूर पदाधिकारी शहर अध्यक्ष दिनेश कांबळे, संपर्क-प्रमुख हिमांशु हावरे, विभाग संघटक वेद खरे, तालुका अध्यक्ष नकुल पिंपळापुरे, शहर सह-सचिव आयुष दंदी, सदस्य निखिल येमदे आणि वारकरी मंच नागपुर जिल्हा अध्यक्ष मयुर रामदासजी वाजगे (MRW) उपस्थित होते. ह.भ.प. निलेश कोंडे देशमुख महाराज आळंदीकर यांचे मनापासून आभार मानण्यात आले. बाबासाहेब सोनटक्के अध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ.रविंद्र भोळे वैधकीय विभाग प्रमुख राम कर्जुले प्रदेश प्रसिद्ध प्रमुख मधुकर महाराज जाधव प्रच्श्रिम कार्याध्यक्ष राम सर आवरे पत्रकार कार्याध्यक्ष आध्यात्मिक प्रमुख शरद कैलास आढाव प्रदेश संघटक याचे सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसचे सर्व नागपूर टिमचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या