Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावविख्यात चित्रकार रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम

विख्यात चित्रकार रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

भुसावळ / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या भित्ती चित्रांच्या प्रतिकृती चित्रीत करणारे भारताचे पहिले चित्रकार, छायाचित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे भुसावळ येथील स्मृतीस्थळी हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कलाक्षेत्रातील अनेक कलाकार ,लेखक यांची उपस्थिती होती.
शहरातील आर्टिस्ट व्हिजन व विविध संस्थांच्या माध्यमातून सोमवारी मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ख्रिश्चन
स्मशानभूमीतील स्मृतिस्थळी सामूहिक अभिवादन व प्रार्थना आयोजित केली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून अहमदाबाद येथील प्रसिद्ध लेखिका तथा ‘पारू का काला गुलाब’ या कादंबरीच्या लेखिका नीलम कुलश्रेष्ठ उपस्थित होत्या. यावेळी सेंट पॉल चर्चचे रेव्हरंड किशोर गायकवाड, आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जावळे, लिलाधर कोल्हे, बन्सीलाल परमार उपस्थित होते. मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक, कलावंत तुषार वाघुळदे ( जळगाव ) माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, रमाकांत भालेराव, वंदना पवार, प्रा.दयाधन राणे, प्रियंका कोळी, अभिराम मेहंदळे, निरंजन शेलार, पत्रकार शेखर पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या