Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यापीठे निकाल लावण्यास करतायेत विलंब...!

विद्यापीठे निकाल लावण्यास करतायेत विलंब…!

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास खूपच विलंब करीत आहे. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सोमवारी राजभवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अनेक अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या