मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर- होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेतील सर्व अडचणी आणि अडथळे दूर करुन महाराष्ट्र शासनाच्यावतीने लवकरच सर्व सोलापूरकरांसाठी आम्ही विमानसेवा सुरू करणारच आहोत, असे ठोस आश्वासन सोलापूर विकास मंचचे सदस्य अर्जुन रामगिर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्यावतीने केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सुरू आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूरातील टेलरिंग व्यवसाय करणारे ७२ वर्षीय अर्जुन रामगिर यांनी सोलापूर ते मुंबई आत्मकलेष पदयात्रा प्रारंभ करुन २८ मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सदर भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांची तात्काळ सोडवणूक करण्याच्या सोलापूर जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. सदर गोष्टीला एक महिना होत असुनही सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को- जनरेशनची अनधिकृत बेकायदेशीर चिमणी गाळप हंगाम संपुनही पडत नसल्याने सोलापूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोलापूरात सर्व सुविधांनी उत्कृष्ट विकसित एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेल्या होटगी रोड विमानतळावरून भारत सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पां पैकी एक केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजनेअंतर्गत विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन वेळा निवड होऊनही सामान्य सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकली नाही , सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकर आणि सोलापूर विकास मंचच्यावतीने ईमेल, प्रशासनाच्या विविध विभागांअंतर्गत प्राप्त शेकडो पत्र, निवेदने, सर्व पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळीं समवेत भेटी गाठी आणि बैठका होऊनही हा विषय सोडवू न शकल्याने १ मे महाराष्ट्र दिनी सोलापूरकर अत्यंत तीव्र स्वरूपांचे उद्रेकात्मक आंदोलन करणार असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत देण्यात आली.
सोलापूर विकास मंचच्या वतीने अर्जुन रामगिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूरच्या विकासाशी निगडित खालील दिलेल्या मागण्या विषद केल्या होत्या :
सर्व सोयींनीयुक्त असलेल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा तात्काळ सुरू करणे.
स्मार्ट सिटी मध्ये सोलापूर महानगरपालिकेचा हिस्सा देणे आणि झालेली कामे हस्तांतरित करुन घेणे.
सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उजणीच्या दुहेरी जलवाहिनीचे कार्य तात्काळ प्रारंभ करणे.
सोलापूर शहरांतर्गत दोन उड्डाण पुलांचे काम त्वरित मार्गी लावणे.
हैद्राबादच्या धर्तीवर सोलापूरातुन सर्व प्रमुख महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेसाठी रिंग रोडचे काम एन. एच.ए.आय. कडुन करुन घेणे.
जुळे सोलापूर आणि हद्द वाढ भागात मुलभुत नागरी सुविधांची कैक वर्षांपासूनची वणवा दूर करणे.शहराच्या सार्वजनिक वाहतूकीसाठी परिवहन बस सेवा सुधारणा करणे आणि नागरिकांना प्रोत्साहन देणे.
नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय अडचण निर्माण होऊ न देणे. सोलापूरात आय.टी.पार्क निर्माण करण्यासाठी व्यापक तरतुदी जसे जमीन, वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन आणि प्रशासकीय परवानग्या मध्ये भरवी सूट देणे. सोलापूरच्या रामवाडी परिसरातील शासनाच्या मालकीच्या जागेत ऑलिम्पिक स्टँडर्डचे सर्व खेळांचे भव्य शासकीय स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करणे.
एअरपोर्टच्या धर्तीवर सोलापूरचे सध्याचे सोलापूर बस स्थानक बस पोर्ट म्हणून विकसित करणे.
महाराष्ट्र राज्य सरकारने सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉरमध्ये समावेश करणे. दिलेल्या मागण्यांपैकी एकाही मागणींची पूर्तता सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत.
सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषण आणि सोलापूर विकास मंचच्या वतीने डिसेंबर महिन्यात आयोजित भव्य मूक मोर्चाविषयीची संपूर्ण माहितीपर वृत्तांत सोलापूर विकास मंचचे सदस्य अर्जुन रामगिर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. सोलापूर विकास मंचच्यावतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील ४५ लाख लोकसंख्येवर प्रभाव असलेल्या सोलापूरातील तब्बल १९८ पेक्षा अधिक नामांकित संस्था आणि संघटनेच्यावतीने पाठिंबा प्राप्त झाला, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देश विदेशातून तब्बल १२,५०० पेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि ऑनलाईन पद्धतीने सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. ह्या सर्वांच्या जनभावनांचा आदर करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सर्व अडथळे तात्काळ दूर करुन नागरी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर वारंवार निवेदन देऊन केली.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ जानेवारी २०२३ रोजी उसाचे गाळप संपलेल्यावर शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते, मागील आठवड्यातही त्यांनी चिमणी पाडकामाविषयी महानगरपालिका आयुक्तांना पूर्वीच सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता उस गाळप संपला असुन शासनाच्यावतीने सोलापूरकरांना दिलेल्या शब्दाचा मान राखत तात्काळ करावी करावी. भारतीय संविधानाने सर्वसामान्य भारतीयांना दिलेल्या नैतिक अधिकारांची सोलापूरात पायमल्ली होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.केंद्र, महाराष्ट्र राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने जाणिवपूर्वक होणार्या अन्यायाविरोधात सोलापूरकरांचे विविध पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर तीव्र आंदोलन होतील. नागरी विमानसेवेस सर्व प्रमुख अडथळे आणि अडचणी दूर करुन सोलापूरकरांच्या जनभावनांचा आदर राखत तात्काळ महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करतील असा आशावाद सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.