Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावविहिरीत तोल गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

विहिरीत तोल गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

एरंडोल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- एरंडोल तालुक्यातील रवंजे खुर्द येथील युवक जितेंद्र गजमल पाटील (वय- ३७) याचा विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रवंजे खुर्द येथील जितेंद्र गजमल पाटील हा युवक सकाळी आपल्या शेतामध्ये कामाला गेला होता. तो शेतातील विहिरीतील पाणी काढत असतांना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला. त्यास शेतातील मजुरांच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. जितेंद्र हा घरातील मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला देविदास बापू पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या