जालना/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भावसार सेवा फौंडेशन जालनातर्फे निसर्ग संवर्धन, वन संवर्धन प्रकल्प अंतर्गत पारसी टेकडी येथे वृक्षारोपणचा व झाडे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.परिसरात अनेक झाडे लावण्यांत आली. तसेच इतर सामाजिक, पर्यावरण प्रेमी संस्थांना रोपे वाटण्यात आली. जास्तीत जास्त झाडं लावणं ही आजची गरज आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल सेवलकर, महेश काळे (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमास राजहंस जाधव (संस्थापक अध्यक्ष), दीपक सुलाखे, रामराव खपले, आनंद चव्हाण, सचिन लांडे, राजेंद्र पतंगे, संदीप चव्हाण, सचिन खपले, अमित काळे, विकास बरडे, योगेश ढवळे, अमोल लोखंडे, विजय चव्हाण, अनंत पालकर, ऋतिक कानगांवकर, संकेत नवले, मनोज सुलाखे, मनोज दर्जे, ज्ञानेश्वर काळे, महेश भावसार लांडे, आशिष खंबायतकर, संदीप पतंगे, श्याम काळे, सुमित्रा जाधव (अध्यक्षा, भावसार महिला मंडळ जालना), अमृता काळे, रमा काळे विश्वजित जुनागडे, रमा जुनागडे, छत्रपती संभाजीनगर व काळे कुटुंबीय यांनी सहभाग घेतला.महेश काळे यांचा वाढदिवस तेथेच जल्लोषात साजरा करण्यात आला.निसर्ग संवर्धन होणे गरजेचे आहे असा सूर या अनेकांनी काढला.