Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावृद्धांवरील अत्याचाराच्या शोधपत्राचे प्रकाशन

वृद्धांवरील अत्याचाराच्या शोधपत्राचे प्रकाशन

मुंबई/ विशेष प्रतिनिधी/ आज १५ जून म्हणजेच “जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस” या दिवसाचे औचित्य साधून “हेल्पएज इंडिया फाउंडेशन” यांनी वृद्ध महिलांच्या अडचणी व त्यांच्यावर होणारया अत्याचारांवर एका शोधपत्राचे प्रकाशन केले. या कार्यक्रमासाठी मुंबई शहराच्या माजी महापौर मा. निर्मलाताई सामंत-प्रभावळकर, हेल्पएज इंडियाचे जॉईंट डायरेक्टर मा. व्हेलरीन पायस,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, इतर मान्यवर, वृद्धमहिला व पुरुष सहकारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः वृद्ध महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचाराविषयी या शोधपत्राच्या अहवालामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे; धक्कादायक म्हणजे ६३% वृद्ध महिलांनी आपल्यावर कुठल्या-ना- कुठल्या प्रकारचा अत्याचार झाला आहे अशी कबुली दिली. समाज म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की ज्या पिढीने आपल्याला घडवलं…त्यांना संरक्षण, मानसन्मान आणि प्रेम आपण दिलेच पाहिजे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या