Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमवॉण्टेड महिला आरोपीला ताब्यात घेताना झाला भुसावळ पोलिसांवर हल्ला..!;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वॉण्टेड महिला आरोपीला ताब्यात घेताना झाला भुसावळ पोलिसांवर हल्ला..!;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळात दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत.जबरी चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या महिलेला अटक करण्यासाठी नंदूरबार गुन्हे शाखेचे पथक स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने पापानगरात पोहोचल्यानंतर संशयित महिलेने महिला पोलिसाला धक्का देत कपडे फाडले तर अन्य इराणी महिलांनी पोलीस पथकावर हल्ला करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची संतापजनक घटना पापानगरात शुक्रवार, २२ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तीन महिलांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चैन चोरी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कनिजा उर्फ मम्मो हुजूर अली ईराणी (पापानगर, भुसावळ) ही वॉण्डेट आहे. संशयित महिलेला अटक करण्यासाठी नंदूरबार गुन्हे शाखेचे पथक भुसावळात शुक्रवारी शहरात आले होते. स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत पथक पापानगरात सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर संशयित कनिजा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने अंगावरील कपडे फाडले तर आरडा-ओरड करीत जमाव जमा केला व गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार राखी अनिल बडगुजर यांना धक्का दिला तसेच अन्य संशयित रूखय्या नादर ईराणी आणि गुलबदन शौकत अली ईराणी महिला पोलीस कर्मचारी राखी बडगुजर आणि कॉन्स्टेबल ललिता बारी यांचे हात पिरगाळले तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करीत शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले. पोलिसांनी अशाही परिस्थितीत संशयित कनिजा हिला ताब्यात घेत नंदूरबार येथे नेले. याप्रकरणी पोलीस हवालदार राखी बडगुजर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या