Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावव्हाईस ऑफ मीडियाच्या समन्वयकपदी डॉ.शरीफ बागवान..

व्हाईस ऑफ मीडियाच्या समन्वयकपदी डॉ.शरीफ बागवान..

जळगाव/,प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली येथे २८ एप्रिल महाराष्ट्र सदन व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन भारतातील सर्व राज्यातील पत्रकारांचे पदाधिकारी पदी नियुक्ती समारंभ थाटामाटात पार पडला. व्हॉइस ऑफ मीडियाचे २८ हजार पत्रकार सभासद झालेले आहेत. संघटनेला दोन वर्षांमध्ये चांगले यश मिळवून देण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांनी केल्याने दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक पत्रकार खासदार संजय राऊत, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक कामरेट भालचंद्र कांगो, वाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महिला संघटक सारिका महोतरा, गगन महोतरा उर्दू विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून नदवी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.शरीफ बागवान यांची व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटरपदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व ज्येष्ठ साहित्यिक कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते देण्यात आले. डॉ.बागवान सामाजिक कार्यकर्ते यांनी मीडियाचे कार्य संपूर्ण भारतामध्ये पसरवून भारताचा प्रत्येक गावातील प्रत्येक पत्रकाराला संघटनेशी जोडण्यात येईल व त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यात येईल असे म्हटले, ते डॉ. शरीफ जळगाव मेहरूण येथील बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन चे अध्यक्ष , बी. वी न्युज २४ चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच अनेक पद त्यांना मिळालेले असून भारतीय पत्रकार संघाचे सचिव .अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशनचे नॉर्थ इंडिया सेक्रेटरी पोलीस मित्र संघटनाचे महाराष्ट्र समन्वयक. महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित आहेत. राज्यस्तरीय मोलाना आजाद आदर्श समाज सेवक पुरस्कार संपादन केलेले व रोटरी क्लब ऑफ इंडियाचे पोलिओ डिस्ट्रिक्ट अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत.अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी.अखिल भातीय जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि अन्याय अत्याचार भ्रष्टचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष तसेच नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरमचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता नवीन नियुक्ती व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटरपद मिळाल्याने सर्व स्तरातील मित्र परिवार तसेच खलील सुर्वे, सुधीर माने ,प्रकाश पाटील ,आबिद अली सय्यद फरान शरीफ डॉ. संदीप सपकाळे. डॉ. अतुल पाटील, वकील भूषण सूर्यवंशी, वकील योगेश वाणी,अजहर खान ,नाझीम निसार, अश्फाक अलीम आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या