Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावशक्ती फाऊंडेशनतर्फे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

शक्ती फाऊंडेशनतर्फे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शक्ती फाऊंडेशन जळगावच्या संस्थापक अध्यक्ष भारती रंधे-म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हरिविठ्ठलनगर येथील रहिवासी व कामगारांची भेट घेतली.फाऊंडेशनच्यावतीने त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना विविध सरकारी योजना व निवारण केंद्राची माहिती दिली.त्यावेळी उपस्थित लोक अभिरक्षक कार्यालयाचेऍ ड.अभिजीत रंधे (बचाव पक्ष सरकारी वकील) यांनी नागरिकांना जिल्हा विधी सेवाद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवेचे मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे फाऊंडेशन चे मयूर देशमुख आणि लोकेश चौधरी यांनी महाराष्ट्र सरकार पुरस्कृत बाल संगोपन योजनेची माहिती दिली.तसेच संतोष भंगाळे व मयूर चौधरी, पृथ्वी देशमुख यांनी जेष्ठ नागरिक आणि कामगारांच्या योजना व अधिकार यावर माहिती दिली.त्यावेळी उपस्थित परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या