Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्या"शाकाहारी टूथपेस्ट सांगून देताय माशांच्या हाडांचा"...., जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर...

“शाकाहारी टूथपेस्ट सांगून देताय माशांच्या हाडांचा”…., जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर गंभीर आरोप…!

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावले, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोलगेट ” आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे”, असं स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र, “आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे” असे सांगून, लोकांना “फिश बोन” (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या