Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावशासन आपल्या दारी" उपक्रम अंतर्गत उद्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री जळगावात

शासन आपल्या दारी” उपक्रम अंतर्गत उद्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री जळगावात

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- “शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजीत कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दि.27 जून रोजी जळगावात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची माहिती जाहीर केली आहे.

दि.२७ रोजी जळगाव शहरात पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव या ठिकाणी दुपारी २.३० वाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला गुलाबराव पाटील, पाणीपु व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गिरीश महाजन, ग्रामविकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा युबक कल्याण मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळावर सकाळी ८.३० वाजेपासून मोफत आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. या ठिकाणी रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच नूतन मराठा विद्यालय या ठिकाणी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मार्फत एकूण २५ स्टॉलची शासकोय योजनांची माहिती व सेवांचा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था एकलव्य क्रीडा संकुल मैदान, जी. एस. मैदान, शिवाजी पुतळा, सागर पार्क, नेरी नाका ट्रॅव्हल्स समोरील मैदान, खान्देश सेंट्रल मौल या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक आणि लाभार्थी यांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या