Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावशाहीर शिवाजीराव पाटील यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार प्रदान

शाहीर शिवाजीराव पाटील यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार प्रदान

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

पाचोरा / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- नगरदेवळा येथील खान्देश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष ,व महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष, तथा खान्देशातील सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ,मातंग साहित्य परिषद ,व समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीराव पाटील यांची शाहिरी, या शाहिरी पोवाड्याच्या पुस्तकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, व पद्मश्री भिकुजी इदाते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात वरील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी शाहीर पाटील यांच्या शाहिरी पोवाड्याचे व प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे विशेष कौतुक केले. तसेच गेल्या चार दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या स्वलिखित अहिराणी ,हिंदी ,मराठी ,भाषेच्या माध्यमातून केलेल्या सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा गौरव उद्गार करताना शिवाजीराव पाटील यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. पुरस्काराचे स्वरूप, शाल श्रीफळ सन्मानचिन्ह ,देऊन शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या शाहिरी पोवाड्याच्या पुस्तकाचा गौरव करण्यात आला.
अथर्व पब्लिकेशन जळगाव तर्फे गेल्या जानेवारीत शाहीर पाटील यांच्या समग्र शाहिरी वाङ्मयाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला,त्यात एकूण चार पुस्तके प्रकाशित करण्यात आली होती, यातील ,,शिवाजीराव पाटील यांची शाहिरी ,,या पोवाड्याच्या पुस्तकाला मातंग साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन 2023 हा सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला पद्मश्री रमेश पतंगे ,पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे ,मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे ,कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संजीव सोनवणे व्यवस्थापन परिषद सदस्य, रवींद्र शिंगणापूरकर समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसन्न पाटील ,अध्यासन प्रमुख डॉ सुनील भडांगे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ, संतोष परसुरे उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वांग्मय साहित्य कृतींना आणि लोककलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रदान करण्यात आला खानदेशातून एकमेव शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या शाहिरी पोवाड्याचा यामध्ये विशेष समावेश होता, शिवाजीराव पाटील यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे शाहीर कृष्णराव साबळे राज्य सांस्कृतिक पुरस्कार तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार असे मानाचे सन्मान लाभलेले आहेत. त्यांना मिळालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराबद्दल खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान जळगाव, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास परिषद , पोलीस दक्षता लाईव्ह , अखिल भारतीय खान्देश महामंडळ मुंबई व महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे तर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या