Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार २१ ते २६ मे दरम्यान...?

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार २१ ते २६ मे दरम्यान…?

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल लागला आहे.त्यामुळे शिंदे सरकारात समाधानाचे वातावरण पसरले आहे. महिन्याभरापासून राखून ठेवलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाने शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे.

बच्चू कडू म्हणाले की, राज्यात विकास कामं करायची असतील तर मंत्रिमंडळ विस्तार होणं आवश्यक आहे.ज्याला कुणाला मंत्री करायचं असेल त्याला करा, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा. राज्याला व्यापक पद्धतीने मंत्रिमडळाची गरज आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घ्यावा असे त्यांनी सुचविले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २१ ते २६ मेपर्यंत होईल, असं सूचक विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.या सूचक विधानाची राजकीय गोटात चर्चा सुरू झालीय.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या