जळगाव – जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री महाजन या देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबत संपावर गेलेल्या आहेत. त्या महापौर म्हणून नाही तर शिक्षिका म्हणून संपात सहभागी झालेल्या आहेत. दुसरीकडे महापालिकेतील एकही कर्मचारी मंगळवारी संपात सहभागी झालेला नव्हता. सर्व कर्मचारी कामावर होते.
जयश्री महाजन या मेहरुण मधील एमडीएस कॉलनीतील राज माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहेत. २००५ यावर्षी त्या शाळेत नोकरीत रुजू झाल्या. याच वर्षापासून शासनाने पेन्शन योजना बंद केली. आता याच जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचारी संपावर उतरले आहेत. शिक्षिका म्हणून शासन आपल्यावरही अन्याय करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शिक्षिका असलेल्या महापौरही संपावर, मनपा कर्मचारी मात्र कामावर
RELATED ARTICLES