Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमशिरपुरात ११ तलवारी जप्त; पोलिसांनी दोन युवकांना केली अटक

शिरपुरात ११ तलवारी जप्त; पोलिसांनी दोन युवकांना केली अटक

(मुख्य संपादक चंदन पाटील, कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे…)

शिरपूर/ प्रतिनिधी चेतन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- खान्देशात अवैध शस्त्र साठा अनेक ठिकाणी पोलिसांच्या तपासणीत आढळून येत असून यावर पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन तरुणांकडून तब्बल ११ तलवारींचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विविध चर्चा सुरू आहे. रोहित राजेंद्र गिरासे (२४) वमनीष ओंकार गिरासे (१९ ), दोन्ही रा.अहिल्यापूर,ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या शहर परिसरात मध्य प्रदेशातून अशी घातक वस्तू येत असतात,यापूर्वीही अनेकदा कारवाई करण्यात आली आहे ,मात्र तपास शून्यच..! आरोपी मोकाट फिरताना दिसून येत असतात असा सूर नागरिकांचा आहे.

शिरपूर शहराचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना तलवार साठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला आदेश दिले होते.रात्री साडेनऊ च्या सुमारास संशयित तरुण दुचाकी (एम.एच.18 ए.यू.9502) वरून शिरपूर फाट्यावर येताच त्यांची झडती घेतल्यानंतर प्लास्टीक कागदात तलवार आढळल्याने ती जप्त करण्यात आली, तसेच संशयीतांची बारकाईने विचारपूस केल्यानंतर रोहित गिरासे याने काम करीत असलेल्या गॅरेजमध्ये साठा ठेवल्याची कबुली दिली. पथकाने शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्टस् नावाने असलेल्या गॅरेजची झडती घेतल्यानंतर प्लास्टीक गोणीतून १० तलवारी पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. एकूण ११ तलवारींसह दोन मोबाईल व दुचाकी मिळून एक लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान तलवारी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या