Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedशिरसोली येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

शिरसोली येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शेतात झाडाच्या फांद्या का फेकल्या? याचा जाब विचारला असता, महिलेला दोन जणांनी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली शोभा किसन बारी वय ४७ हे वास्तव्यास आहेत. १३ जुलै रोजी शोभा बारी यांच्या शेतात गावातीलच मदन हिरामण ताडे व अनिल हिरामण ताडे या दोघांनी बोरीच्या झाडाच्या १५ फांद्या फेकल्या, याचा जाब विचारला असता शोभा बारी यांना मदन ताडे आणि अनिल ताडे या दोघा भावंडांनी काठीने मारहाण केली, या मारहाणीत शोभा मारी ह्या जखमी झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मदन ताडे तसेच अनिल ताडे या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या