Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हा संघटकपदी सिद्धाराम म्हमाणे

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हा संघटकपदी सिद्धाराम म्हमाणे

सोलापूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सिध्दाराम म्हमाणे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांनी ही निवड केली आहे. दरम्यान राज्य उपाध्यक्ष राजु पाटील, सरचिटणीस विजय मालनकर, सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत, राजेश कुचिकर, खजिनदार देविदास माडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हानिहाय जिल्हा संघटक व कक्ष जिल्हा समन्वयक यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सामाजिक चळवळीत काम करणारे श्री. म्हमाणे हे कोरवली तालुका मोहोळ ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. आजपर्यंत ऊस दरवाढ आंदोलन, वीज जोडणी आंदोलन, दूध दरवाढ आंदोलन, रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन अशा विविध आंदोलनातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जागरूक असतात. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला काम करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या