Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedशेतातील खळ्यात झोपलेला असताना सर्पदंशाने बालकाचा अंत

शेतातील खळ्यात झोपलेला असताना सर्पदंशाने बालकाचा अंत

यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- यावल तालुक्यात सर्पदंशच्या दोन घटना घडल्या आहेत.तालुक्यातील हिंगोणा गावात खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरबार बिरलाल बारेला वय नऊ वर्ष रा.हिंगोणा हा आपल्या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबासोबत गावाजवळ असलेल्या वसंत परदेशी यांच्याकडे शेतीकामास असल्याने नजीकच्या खळयात राहत होते. दरम्यान दिनांक २० जुलै गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास खळयात झोपेत असतांना त्याला उजव्या हाताच्या पाठीमागे विषारी सापाने दंश केल्याने तो जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली. याबाबत मयत बालकाच्या नातेवाईवाईकांनी पोलिसात खबर दिली. फैजपूर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरबार बारेला या बालकाच्या मृतदेहाचे यावल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनेचा पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेश बऱ्हाटे हे करीत आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या