जळगाव/तेजस भंगाळे/पोलीस दक्षता लाईव्ह:- आज दि.15 ऑगस्ट 2023 रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालययात 15 ऑगस्ट “स्वतंत्र दिवस ” उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन व ध्वजारोहण समस्त लाडवंजारी श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत पन्नालाल वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे संचालक, श्री.भानुदास नाईक हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. पन्नालाल बंजारी, उपाध्यक्ष श्री. बालाजी सानप, संस्थेचे विद्यालयाचे संचालक, वासुदेव सानप, अरुण चाटे संतोष वाटे, किशोर ढाक्ने, विजय वाघ, सुरेश लाड, कृष्णाभाउ ढाकणे, संध्याताई वंजारी, दिलीप लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, देविदास आंधळे, संध्याताई नाईक, दिलीप लाडवंजारी, विजय वाघ, राजेंद्र वंजारी अक्रम शेख, राहुल लष्करे, भगवान लाडवंजारी, विद्यालायाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी, श्रीमती ईश्वरी इसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात भारतमाता व श्रीरामाच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. श्री. चंद्रकांत पन्नालाल वंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयातील 9 वी तील विद्यार्थिनी मेघा वाणी 7 वी तील विद्यार्थिनी अशापक पिंजारी, जीशान पिंजारी, जयश्री पारधी यांनी देशभक्तीपर गीत गायन सादर केले तसेच नाजमीन तडवी हिने देशभक्तीपर भाषण सादर केले. विद्यालयातील मुख्याध्यापक यांनी 10 वीतील प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थ्यांना के. कुसुम सदाशिव जोशी यांच्या नावे 501 रुची शिष्यवृत्ती वाटप केली. तसेच इंग्रजी शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी के, प्रभाकर धर्मा महाजन यांच्या नावे इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थ्यांना 1001 रु. शिष्यवृत्तीवाटप करण्यात आली. तसेच कैलासवासी त्र्यंबक बळीराम सोनावणे यांच्या नावे 10 वीतील चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण 501 रु.ची शिष्यवृत्ती वाटप केली या नंतर प्रसंगी श्री. बालाजी सानप यांनी स्वतंत्र दिनाचे महत्व सांगितले तसेच भानुदास नाईक यांनी स्वतंत्र वीरांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सौ.संत्रो पिंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सरस्वती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.