Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याश्री.जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळे पायी दिंङी सोहळा

श्री.जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळे पायी दिंङी सोहळा

सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- श्री.जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळे पायी दिंङी सोहळा आजपासून सुरू झाला आहे.श्री.क्षेत्र अंजाळे ते महाक्षेत्र पंढरपूर दिंङी आषाढी वारी निमीत्त पंढरपूर जाण्यासाठी अंजाळे येथून आज दि. 28 मे रोजी निघाली आहे. दिंङीमध्ये दिंङी प्रमुख ह.भ.प. धनराज महाराज, विणेकरी चिंतामण महाराज, संजय महाराज, जितू महाराज सोयगाव,शालीक महाराज,दिनेश महाराज यांचे सोबत सावदा येथून माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी,मधुकर कोळी, वासुदेव लोमटे,चुङामण भंगाळे,निळकंठ नेमाडे, कांतीलाल पाटील(आव्हाणे),आणि 300 वारकरी महिला – पुरूष सहभागी झाले आहेत. टाळ मृदुंगाच्या आणि विविध भजनाच्या निनादात मोठ्या भक्तीभावाने ही दिंङी निघाली आहे.सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहे. 23 जून 2023 रोजी पंढरपूर येथे हू दिंडी पोहचणार आहे असे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या