जळगाव/ तेजस भंगाळे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अंतर्गत श्री स्वामी समर्थ इंग्लीश मेडीयम स्कूल कुसुंबा शाळेत 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी हातात मातीचे दिवे घेवून धरती मातेला वदन व सैनिकांना नमन केले. सोबत रंगभरण स्पर्धा, चित्र काढणे व रंगविणे, वेशभूषा, वृक्षव स्पर्धा, गायन, नृत्य तसेच तिरंगा रंगात खाण्याचे पदार्थ बनविणे. या साठी संस्था अध्यक्ष आदरणीय मनोज पाटील सर तसेच संचालिका व मुख्यध्यापिका सौ. प्रतिता मॅडम यांचेही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभले, तसेच सर्व कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही मुख्यध्यापिका तनुजा मोती मॅडम यांनी सर्व शिक्षकांसोबत पार पाडले. पालक व ग्रामस्यांचे देखील सहकार्य कार्यक्रमाला मिळाले.