जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शिरसोली येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांचा मंगळवार दि. १५ आँगस्ट २०२३ रोजी संपूर्ण भारत देशात मुक्ती पर्व दिवस सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन शिरसोली रोड जळगाव येथे सकाळी 10.00 ते 12.00 वा.विशाल असे सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी सत्संगाचा लाभ घ्यावा, तसेच सत्संग समाप्ती नंतर लंगरचेही आयोजन करण्यात आलेले आहे. असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे संयोजक रमेशकुमार आहुजा यांनी केले आहे.