Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमसंत मुक्ताई मंदिराच्या मागे तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून....! परिसर हादरला

संत मुक्ताई मंदिराच्या मागे तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून….! परिसर हादरला

मुक्ताईनगर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जिल्ह्यात खुनाच्या तसेच घरफोड्याच्या घटना कमी होत नाही तोच मुक्ताईनगरनजीक एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. शहराजवळच्या श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला एका तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर शहराजवळच्या संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच आज सकाळच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरूणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यार तसेच दगड वा तत्सम वस्तूने वार केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यापासून थोड्या अंतरावर हा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. या तरूणाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. तर या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या