Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसंत शिरोमणी श्री खुशालदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संत शिरोमणी श्री खुशालदास महाराज जयंती उत्साहात साजरी

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव भावसार समाजातर्फे श्री हिंगलाज माता देवी मंदिर हॉल येथे साला बादाप्रमाणे भावसार समाज कुलूत्पन्न संत शिरोमणी श्री खुशालदास महाराज जयंती उत्साहात साजरी झाली.माजी अध्यक्ष अरुण भावसार, अध्यक्ष प्रितेश,सचिव शैलेंद्र पांडे यांचे हस्ते श्री संत खुशालदास महाराजाचे प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण करून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली.

श्री गणपती, श्री हिंगलाज माता आरती, व श्री खुशालदास महाराजांची आरती करण्यात आली. श्री महाराजांची व हिंगलाज मातेचा जयघोष करून सभागृहात दणदणीत सुंदर पवित्र उत्साह वातावरण तयार झाले. प्रसंगी कार्यकारिणी सदस्य अनिल भावसार, खजिनदार सतीश भावसार,सदस्य नितीन भावसार. जळगाव जिल्हा ए.आय. बी.के.चे युवा परिषद अध्यक्ष सुमित लोखंडे, (भावसार ) श्री.किरण भावसार ,भावसार समाजाचे वरिष्ठ समाज बांधव रमेश गंगाराम भावसार,अशोक खंडूलाल भावसार आदी हजर होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या