Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeक्राईमसमतानगरात दारूच्या नशेत एकास मारहाण;गुन्हा दाखल

समतानगरात दारूच्या नशेत एकास मारहाण;गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच शहरातील समतानगर येथे दारुच्या नशेत एकाने दोन जणांना बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. सध्या मारहाण, चोऱ्या ,दरोडे या घटनेत वाढ झाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील समतानगर येथे नसीर मुनीर शेख वय ४० हे वास्तव्यास आहेत. २४ जून रोजी रात्री ११ वाजता ते घरी असतांना, याठिकाणी समतानगर परिसरातील धामणगाववाडा या भागात राहणारा विक्की हा आला, त्याने शेख , यांचा दरवाजा ठोठावला, त्याला इकडे रस्ता नाही, तू तिकडून जा….असे नसीर शेख यांनी सांगितले असता, विक्कीने दारुच्या नशेत नसीर शेख आणि त्यांचा मुलगा या दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नसीर शेख यांच्या पत्नीसह शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी नसीर शेख यांच्या तक्रारीवरुन विक्की नामक तरुणाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या