मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा सुरू आहे .
कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थाने प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी ( सचिव धनाजी नाना विद्या प्रबोधनी जळगाव ), राजेंद्र ननवरे ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य), भानुदास येवलेकर ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य), दिनेश चव्हाण ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य) , प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे ( शिरीष मधुकरराव चौधरी कला विज्ञान महाविद्यालय जळगाव.) प्राचार्य डॉ. राकेश चौधरी सर,डॉ.निलेश चौधरी (कार्यशाळा समन्वयक) . आणि डॉ. नितीन बडगुजर (कार्यशाळा सह समन्वयक), डॉक्टर प्रशांत भोसले आय. क्यू. ए. सी. चेअरमन, इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते.
राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करताना विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता हा विषय समजावा तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व समस्या याच्या प्रश्नांची उत्कल करता यावी हा या कार्यशाळेच्या आयोजना चा उद्देश आहे असे डॉ. चौधरी त्यांनी निर्देशित केले. विशेष करून या कार्यशाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनाच सहभाग जास्त नोंद करायला लावला आहे ,असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या कार्यशाळेसाठी जवळपास 120 विद्यार्थी आज सहभागी असल्याचे दिसत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील पूर्वीच्या कालावधीमध्ये नारी यांना पूजनीय आणि नारीशक्ती असे महत्त्वाचे ठिकाणी स्थान होते . सध्याच्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी क्रांतीसुर्य सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी जर क्रांती पेटवली नसती तर आजच्या महिला कदाचित घडल्या नसत्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या महिला, प्रधानमंत्री होणाऱ्या महिला आणि कित्येक पद भूषविणाऱ्या महिला , अंतराळामध्ये झेपावणाऱ्या महिला या निर्माण झाल्या नसत्या . असे मत प्रा.नन्नवरे यांनी व्यक्त केले. आदिशक्ती म्हणून महिलांना ओळखले जाते असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. पी.आर. चौधरी यांनी आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता याविषयी सखोल मार्गदर्शन व्हावे. तसेच आजचा विद्यार्थी हा भविष्यातला सुज्ञ नागरिक बनणार आहे . त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनीच सर्वप्रसंगी सहभाग नोंद करावा अशा गोष्टी वेळोवेळी कल्याणकारी गोष्टी यामध्ये सहभाग घ्यावा क्षेत्र कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन देशाचा विकास कसा होईल. याकडे आपण लक्ष केंद्रित करावे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जयंती दिवस आहे. त्यामुळे लिंगभाव समानता हा विषय आजच्या दिवशी खूपच समर्पक आहे असे प्रतिपादन डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले .
त्यानंतर डॉ. नितीन बडगुजर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन सत्राचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कल्पना भारंबे मॅडम यांनी केले .
कार्यशाळेमध्ये मुंबई येथील थिटे यांनी दिवसभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . काही खेळ सुद्धा घेतले. खेळाच्या माध्यमातून लिंगभाव समानता कशा स्वरूपाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले तसेच काही शॉर्ट फिल्म सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवल्या की ज्यामधून लिंगभाव समानता हे काय आहे हे त्यांना सर्वांना समजले पाहिजेत असे त्यांनी सांगितले .