जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सद्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने शेतात अथवा घरात अडगळीच्या ठिकाणी सर्प दृष्टीस पडत आहेत.तसेच मुख्यतः शेतात सर्पांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळं सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढले असून, सर्पदंश झालेल्या रुग्णास त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे. तरी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सर्पदंश झालेल्या रुग्णाकरिता तत्काळ औषध उपचारासाठी उपाययोजना राबवावी असे निवेदनात म्हटले आहे. पावसाच्या दिवसांमध्ये साथीचे रोग व सर्पदेश चे रुग्ण वाढतात हि परिस्थिती नित्याचीच असल्याने जिल्ह्यातील सर्वसाधारण गरीब लोकांकरिता (रुग्णानाकारिता) उत्तम उपचाराकरिता उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. तरी या दिवसात सर्पदंशच्या घटना जास्त प्रमाणात घडतात, यामुळे शेतात काम करणारे मजूर व शेतकरी वर्गातील लोकांना सर्पदंश सारख्या अति गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते, व अशा परिस्थितीत रुग्णाला लवकरात लवकर चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे. शेतकरी बऱ्याचदा आरोग्य केंद्रापासून लांब अंतरावर असतो.आणि जरी आरोग्य केंद्रामध्ये वेळेत पोहचल्यावरही त्या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्रात औषध, संसाधनाची अनुउपलब्धता व तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे तेथील यंत्रणा प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात किंवा सुचवतात. जिल्ह्याचे मोठे रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी योग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हाभरातून रुग्ण उपचारार्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येतात. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर सर्पदेशच्या (Snakebite) रुग्णांकरिता योग्य निदान मिळवण्यासाठी आपल्या अधिपात्यात तत्काळ वार्ड व औषधीसह एक स्वतंत्र कक्ष उभारावे आणि जिल्ह्यातील जनतेस योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी जनहिताची मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पार्टी नरेंद्र भागवत सपकाळे (वैद्यकीय सहायता महानगर प्रमुख जळगाव) यांच्या वतीने मा. वैद्यकीय अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांना देण्यात आले आहे.
सर्पदंश च्या रुग्णांकरिता त्वरित उपचार मिळवून देणेबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा रुग्णालयाला निवेदन
RELATED ARTICLES