Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedसहाय्यक पोलीस आयुक्तांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून केला खून...!

सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून केला खून…!

पुणे/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं.या घटनेने परिसर हादरला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड(वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या