Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासांस्कृतिक धोरण समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक आपात परिस्थितीमुळे पुढे ढकलली

सांस्कृतिक धोरण समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक आपात परिस्थितीमुळे पुढे ढकलली

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक धोरण समितीच्या रंगभूमी उपसमितीची दिनांक 22 व 23 रोजी अनुक्रमे नागपूर व अमरावती येथे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई पुण्यासह संपूर्ण कोकणपट्टीत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात ही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या सदस्यांना प्रवास करणे अवघड होऊ शकते किंवा प्रवासादरम्यान मध्येच अडकून पडावे लागू शकते. या बाबीचा विचार करता नागपूर आणि अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठका तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याशी तसेच उपसमितीचे निमंत्रक व सदस्यांशी विचार विनिमय करून लवकरच विदर्भातील बैठकांसाठी पुढील तारीख ठरविण्यात येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या