Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासाई मंदिरात आता हार,फुले, प्रसाद नेता येणार; संस्थानचा निर्णय

साई मंदिरात आता हार,फुले, प्रसाद नेता येणार; संस्थानचा निर्णय

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

शिर्डी /विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शिर्डी प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात आता भाविकांना हार, फुले आणि प्रसाद घेता येणार आहे.या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये आनंद पसरला आहे.साई संस्थान समितीने आता ही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता साई संस्थानच्या माध्यमातून भाविकांना माफक दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. ही फुले शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिर परिसरात भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साईभक्तांची होणारी ही लूट थांबणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे. साई संस्थान आता कोरोनाच्या काळात घातलेली बंदी उठवणार आहे. कोरोनाच्या काळात संस्थेने साईबाबांना फुले, हार आणि नैवेद्य दाखवण्यास बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात शिर्डीच्या साई मंदिरात फुले व प्रसाद नेण्यास बंदी घातल्याने भाविक आणि दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही बंदी उठवण्याची मागणी भाविक व दुकानदारांकडून शिर्डी संस्थानकडे सातत्याने होत आहे. शिर्डीच्या काही ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी बळजबरीने साईबाबा मंदिरात हार आणि फुले नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली .दरम्यान या सकारात्मक निर्णयाचा भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या