Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात साकरी रस्त्यावर गोळीबार, दोन जण जखमी; पोलीस बंदोबस्त तैनात!

भुसावळात साकरी रस्त्यावर गोळीबार, दोन जण जखमी; पोलीस बंदोबस्त तैनात!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

भुसावळ /कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ तालुक्यातील साकरी रस्त्यावर गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला असून समाजकंटकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा फायदा घेतल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील रेल्वे उड्डाण पुलाखालून जाणारा साकरी रस्त्यावर संशयित तीन जणांनी बंदुकीने गोळीबार करीत दोन जणांना त्यांनी जखमी केल्याची घटना दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.जखमींना उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदरील संशयित आरोपींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा फायदा घेत गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे तसेच पोलीस कर्मचारी व आर.सी.पी.प्लाटून दाखल झाले आहेत. गोळीबार झालेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..पुढील तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळी पोलीस प्रशासनाला दोन काडतुसाची पुरणी मिळाली आहेत..
गोळीबार का झाला ? आणि कोणी केला हे अद्यापपावेतो समजू शकले नाही.

घटनास्थळी पोलीस प्रशासनाला काडतुसाची पुरणी मिळाली

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या