Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासातपुडा पर्वतात ढगफुटी; आमदार चौधरींकडून पाहणी

सातपुडा पर्वतात ढगफुटी; आमदार चौधरींकडून पाहणी

रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यात ज़ोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे भयानक नुकसान झाले आहे. पुनः एकदा नदी नाल्यात पूर आला.त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. सातपुडा पर्वतात ढगफुटी झाल्यामुळे भोकर नदीला मोठा पूर आला. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी पूलांवरुन ओसंडून पाणी वाहू लागले.आभोडे गावाला जाणाऱ्या पुलाचे आजूबाजूचा रस्ता वाहून गेल्याने केऱ्हाळा- अहिरवाडी- निरुळ- पातोंडी- बोरखेडा ता. रावेर या गावांचा संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तात्काळ तिथे भराव टाकून रस्ता सुरू करण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी केल्या तसेच सर्व पुलांचे प्रस्ताव तयार शासनाकडे सादर करण्यास सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या